राजकारण

Kishori Pednekar : मुंबई महापौर निवडणुकीत ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट, 'या' नेत्याची स्पष्ट सांगितलं

मुंबई महापालिकेतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक झाली.

Published by : Riddhi Vanne

मुंबई महापालिकेतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पक्षाची भूमिका मांडली.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते आणि ते आम्ही मान्य करतो. मुंबईला मराठी महापौर मिळणार असल्याचे स्वागत करत, ठाकरे गट विरोधी पक्षाची जबाबदारी ताकदीने पार पाडेल, असे संकेत त्यांनी दिले. थेट महापौरपदासाठी उमेदवार देण्याबाबत त्यांनी स्पष्ट वक्तव्य टाळले.

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आजही मुंबईत जिवंत असल्याचे सांगितले. मराठी माणसाच्या हक्कांसाठीची लढाई कायम सुरू राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता प्रत्येक नगरसेवक आपापल्या प्रभागातील प्रश्न सभागृहात ठामपणे मांडेल आणि कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महायुतीने महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून रितू तावडे तर शिवसेना (शिंदे गट) कडून संजय घाडी यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तासंघर्ष आणखी रंगणार, हे निश्चित आहे.

थोडक्यात

  1. मुंबई महापालिकेतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  2. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली.

  3. बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

  4. त्यांनी सांगितले की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते आणि ते आम्ही मान्य करतो.

  5. मुंबईला मराठी महापौर मिळणार असल्याचे त्यांनी स्वागत केले.

  6. ठाकरे गट विरोधी पक्षाची भूमिका ताकदीने पार पाडेल, असे संकेत त्यांनी दिले.

  7. थेट महापौरपदासाठी उमेदवार देण्याबाबत त्यांनी स्पष्ट वक्तव्य टाळले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा