राजकारण

Rohit Pawar : "काकींची तयारी नाही, सत्ता प्राधान्य! रोहित पवारांचे आरोप चर्चेत

Rohit Pawar And Sunetra Pawar : अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत परखड मत मांडलं.

Published by : Riddhi Vanne

Rohit Pawar And Sunetra Pawar : अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत परखड मत मांडलं. विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर त्यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या.

रोहित पवार म्हणाले की, अपघातानंतर अवघ्या काही दिवसांत शपथविधी उरकण्यात आला. सत्ता टिकवण्याची घाई काही नेत्यांना अधिक महत्त्वाची वाटली असावी. सुनेत्रा काकी स्वतः मानसिकदृष्ट्या तयार नसताना त्यांच्यावर निर्णय लादला गेला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एका कुटुंबासाठी दुःख आणि सत्य शोधणं महत्त्वाचं असताना काही लोकांची प्राधान्यं वेगळी असल्याचंही त्यांनी सूचित केलं.

ते पुढे म्हणाले की, आपण मांडत असलेल्या गोष्टी अफवा नाहीत, तर थेट आणि स्पष्ट भूमिका आहे. आमच्यासाठी अजितदादांचा अपघात कसा झाला, हे समजणं सर्वात महत्त्वाचं आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. शरद पवार यांच्या विधानाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, अपघातानंतर काही तासांत मर्यादित माहिती असते. त्या क्षणी संयम राखणं गरजेचं होतं. म्हणूनच आता काही दिवसांनी अधिक माहितीच्या आधारे आपण बोलत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात

  1. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींवर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

  2. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर गंभीर शंका व्यक्त केल्या.

  3. रोहित पवार म्हणाले की, अपघातानंतर अवघ्या काही दिवसांत शपथविधी उरकण्यात आली.

  4. सत्ता टिकवण्याची घाई काही नेत्यांना अधिक महत्त्वाची वाटली असावी.

  5. सुनेत्रा काकी मानसिकदृष्ट्या तयार नसताना निर्णय लादला गेला असण्याची शक्यता

  6. एका कुटुंबासाठी दुःख आणि सत्य शोधणं महत्त्वाचं, तरीही काही लोकांची प्राधान्ये वेगळी असल्याचं सूचित.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा