BJP's Ritu Tawde has been elected as the Mayor of Mumbai in the Mumbai Municipal Corporation. 
राजकारण

Mumbai Mayor : अखेर ठरलं! मुंबई पालिकेवर आता भाजपचा महापौर, उपमहापौरपदी शिंदेची शिवसेना

मुंबई पालिकेवर भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदाची जबाबदारी शिवसेनेचे संजय घाडी यांच्याकडे देण्यात आली आहे.

Published by : Riddhi Vanne

BJP's Ritu Tawde has been elected as the Mayor of Mumbai : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनंतर अखेर महापौर आणि उपमहापौर पदांवरील सस्पेन्स संपला आहे. आज भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या संयुक्त बैठकीत दोन्ही पदांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले.

या निर्णयानुसार भाजपच्या रितू तावडे Ritu Tawde यांची मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदाची जबाबदारी शिवसेनेचे संजय घाडी Sanjay Ghadi यांच्याकडे देण्यात आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौरपदाची घोषणा केली, तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर केली.

महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे सत्तेचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीला दोन्ही पक्षांमध्ये महापौरपदावरून चर्चा सुरू होती, मात्र अखेरीस भाजपकडे महापौरपद आणि शिवसेनेकडे उपमहापौरपद देण्यावर एकमत झाले. दरम्यान, ठाकरे गटाकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांची निवड बिनविरोध होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनंतर महापौर आणि उपमहापौर पदांवरील सस्पेन्स संपला आहे.

  • आज भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या संयुक्त बैठकीत दोन्ही पदांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले.

  • निर्णयानुसार भाजपच्या रितू तावडे यांची मुंबई महापौरपदी निवड करण्यात आली आहे.

  • उपमहापौरपदाची जबाबदारी शिवसेनेचे संजय घाडी यांच्याकडे देण्यात आली आहे.

  • अमित साटम यांनी महापौरपदाची घोषणा केली, तर राहुल शेवाळे यांनी उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा