Harshvardhan Sapkal  
राजकारण

Harshvardhan Sapkal : सपकाळांच्या 'या' वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली होती. या विधानानंतर भाजपकडून जोरदार आक्षेप नोंदवण्यात आला.

Published by : Riddhi Vanne

महाराष्ट्रात एका वक्तव्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली होती. या विधानानंतर भाजपकडून जोरदार आक्षेप नोंदवण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांनी सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी केली. राज्यातील काही भागांत भाजप कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलनही केले.

वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. धमक्या दिल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मात्र, त्यांच्या बोलण्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, असे सांगत त्यांनी संबंधित वक्तव्य मागे घेतले. या घटनेमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.

थोडक्यात

  1. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य

  2. टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना

  3. सपकाळ यांनी टिपू सुलतानचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली

  4. भाजपकडून जोरदार आक्षेप

  5. विरोधी पक्षांकडून संताप व्यक्त

  6. राजकीय वातावरणात तणाव आणि वाद उफळले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा