Narendra Modi नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या Israel इस्रायल दौऱ्याच्या पूर्वसंध्येला तेथील राजकारण ढवळून निघाले आहे. 25 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या भेटीत मोदी, पंतप्रधान Benjamin Netanyahu बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष Isaac Herzog सॅक हर्झोग यांच्यासोबत महत्त्वाच्या चर्चा करणार आहेत.
मोदी इस्रायली संसदेत भाषण करणार असले तरी त्या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रण नसल्याने वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते Yair Lapid यायर लॅपिड यांनी परंपरेचा अवमान होत असल्याचा आरोप करत भाषणावर बहिष्काराची भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते, सरन्यायाधीश Yitzhak Amit यित्झाक अमित यांना आमंत्रण देणे आवश्यक आहे.
दरम्यान, संसदेचे अध्यक्ष Amir Ohana अमीर ओहणा यांनी विरोधकांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देत कार्यक्रम सुरळीत पार पडेल, असे स्पष्ट केले. विरोधकांच्या भूमिकेमुळे भारत-इस्रायल मैत्रीवर परिणाम होऊ नये, असेही त्यांनी म्हटले. इस्रायलमध्ये न्यायव्यवस्थेतील बदलांवरून आधीच सरकार आणि न्यायालय यांच्यात मतभेद आहेत. त्यातच मोदींच्या भेटीआधीचा हा वाद राजकीय वातावरण अधिक तापवत आहे.
थोडक्यात
नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा इस्रायल दौरा सुरु होणार आहे.
दौऱ्याची सुरुवात २५ फेब्रुवारी पासून होईल.
इस्रायलमध्ये मोदी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष इसहाक हर्झोग इसहाक हर्झोग यांच्यासोबत महत्त्वाच्या चर्चा करतील.
दौरा इस्रायली राजकारणात हलचल निर्माण करत आहे.