Donald Trump 
देश-विदेश

Donald Trump : ट्रम्पला मोठा हादरा, इराण थेट मैदानात! अमेरिकेनं हल्ला केला तर काय होईल?

मध्य पूर्वेत तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिका आणि इराण आमनेसामने उभे ठाकले असून परिस्थिती कोणत्याही क्षणी चिघळू शकते.

Published by : Riddhi Vanne

मध्य पूर्वेत तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिका आणि इराण आमनेसामने उभे ठाकले असून परिस्थिती कोणत्याही क्षणी चिघळू शकते. अमेरिकेकडून कारवाईची शक्यता व्यक्त होत असतानाच, इराणने स्पष्ट इशारा दिला आहे. हल्ला झाला तर तो थेट युद्ध मानले जाईल.

अमेरिकेने आपल्या शक्तिशाली युद्धनौका आणि लढाऊ विमाने त्या भागात पाठवली आहेत. त्यामुळे वातावरण अधिक तापले आहे. युद्ध पेटल्यास तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा फटका भारतासह अनेक देशांना बसू शकतो.

दरम्यान, रशिया इराणच्या बाजूने उभा राहिल्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर हिंद महासागर आणि ओमानच्या समुद्रात दोन्ही देश संयुक्त नौदल सराव करणार आहेत. या घडामोडींमुळे जागतिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिका, इराण आणि रशिया यांच्यातील वाढता तणाव जगासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पुढील काही दिवस निर्णायक ठरू शकतात.

थोडक्यात

  • मध्य पूर्वेत तणाव कमालीचा वाढला आहे.

  • अमेरिका आणि इराण आमनेसामने उभे ठाकले असून परिस्थिती कोणत्याही क्षणी चिघळू शकते.

  • अमेरिकेकडून कारवाईची शक्यता व्यक्त होत असतानाच, इराणने स्पष्ट इशारा दिला आहे. हल्ला झाला तर तो थेट युद्ध मानले जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा