महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षांना मंगळवार, 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. नाशिक जिल्ह्यात यासाठी 129 परीक्षा केंद्रे सज्ज असून सुमारे 82 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाची परीक्षा होणार आहे.
यंदा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी बोर्डाने कडक उपाययोजना केल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने, कॉपी किंवा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक आणि तांत्रिक शाखेतील विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. बोर्डाने विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे आणि प्रवेशपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे.
बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे दिवस असून, तयारी आणि शिस्तीवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थोडक्यात
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांना मंगळवार, 10 फेब्रुवारीपासून सुरुवात.
नाशिक जिल्ह्यात 129 परीक्षा केंद्रे सज्ज.
सुमारे 82,000 हून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार.
इंग्रजी विषयाची परीक्षा पहिल्या दिवशी होणार.