थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Santosh Deshmukh Case ) बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील आल्या. राज्यात तणाव निर्माण झाला होता.
अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर आज संतोष देशमुख प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. संतोष देशमुख प्रकरणाची आज 23 वी सुनावणी पार पडणार असून आज जिल्हा व सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का, याकडे विशेष लक्ष आहे. सुनावणीत काय निर्णय होतो, पुढील दिशा काय असेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 23वी सुनावणी
जिल्हा व सत्र न्यायालयात होणार सुनावणी
सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का? याकडे लक्ष