थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेतून 45 लाख महिला बाद झाल्याची माहिती मिळत आहे. ई-केवायसी केल्यानंतरही 26 लाख महिला लाभापासून वंचित असून 31 डिसेंबर 2025 ला ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख होती.
ई केवायसी करूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. आता 45 लाख महिला बाद झाल्या आहेत. ई केवायसी करताना 26 लाख महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी करून घेणार असल्याची माहिती मिळत असून अंगणवाडी सेविकांचा पडताळणी करण्यास नकार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
लाडकी बहीण योजनेतून 45 लाख महिला बाद
ई-केवायसीनंतरही 26 लाख महिला लाभापासून वंचित
31 डिसेंबर ही ई-केवायसीची शेवटची तारीख होती