महाराष्ट्र

मुंबईत 15 दिवस जमावबंदीचे आदेश

मुंबईत 15 दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत 15 दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी शहरात 23 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मुंबईत मराठा मोर्चा धडकणार आहे तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून २८ जानेवारीपर्यंत पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. त्यामुळे २३ जानेवारी मध्यरात्रीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवस मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा