महाराष्ट्र

अभिनेत्री काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Published by : Lokshahi News

अभिनेत्री काम्या पंजाबी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आता काँग्रेसमधील स्टारपॉवर वाढवताना दिसत आहे.

काम्या पंजाबी यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आज मुंबईत झाला. या वेळी पक्षाचे नेते तहसीन पूनावाला हेसुद्धा उपस्थित होते. तहसीन पूनावाला यांनी काम्या यांचे पक्षात स्वागत असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काम्या पंजाबी यांनी काँग्रेस परिवारात प्रवेश केला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रियांका गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम्या या जनतेची सेवा करतील. भाई जगताप यांच्यासारखे अध्यक्ष लाभणे हे त्यांच्यासाठी सुदैवाचे आहे.

काम्या पंजाबी या बिग बॉस सीझन 7 मधील स्पर्धक होत्या. त्या मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. शक्ती-अस्तित्व के एहसास की या शोचे चित्रीकरण त्यांनी नुकतेच संपवले आहे. त्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात आहेत. बनू मै तेरी दुल्हन, मर्यादा : लेकीन कब तक?, बेइंतहा आदी लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा