(Ajit Pawar Death in Plane Crash ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. अजित पवारांसह या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला असून या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता विमान कंपनीकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. विमान कंपनीकडून सांगण्यात आले की, "सदर विमानाला कोणतीही समस्या नव्हती. विमान १०० टक्के सुरक्षित होते. तसेच विमानाचा क्रू बऱ्यापैकी अनुभवी होता. अपघातासाठी कदाचित कमी दृश्यमानता कारणीभूत असू शकेल. तरीही डिजीसीएच्या चौकशीतून खरे कारण समोर येईल." असे विमान कंपनीकडून सांगण्यात आले आहे.