( Baramati) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्याहून NDRFचे एक पथक बारामतीत घटनास्थळी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हेही उपस्थित होते.
पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आणि विमान अपघात कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून घटनास्थळी असलेल्या विमानाचा ढिगाऱ्यची आज एनडीआरएफच्या उपस्थितीत पोलीस फॉरेन्सिक पथकाने पुन्हा तपासणी केली.