थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray - Raj Thackeray ) आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्त आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात मुंबईतील भव्य सोहळ्याने होणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या सोहळ्यात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळत असून यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Summary
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त भव्य सोहळा
शिवसेना-मनसेकडून मुंबईत भव्य सोहळ्याचं आयोजन
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सोहळा