थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP) महापालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक पार पडणार असून मुंबई भाजपच्या निवडणूक संचालन समितीची संध्याकाळी 6 वाजता वर्षावर बैठक होणार आहे.
मुंबईतील सत्ता समीकरणासह गट स्थापनेवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच महापौर निवड, समित्यांसह सत्तेतील जबाबदाऱ्यांचे वाटप व इतर बाबींवर मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
Summary
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली
भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक
मुंबईतील सत्ता समीकरणासह गट स्थापनेवर चर्चा होणार