ओबीसी समाजाचे गेलेलं आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध येवल्यातील भाजपा ओ. बी. सी मोर्चा येवला शहराच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी येवल्यातील विंचूर चौफुली येथे मनमाड – नगर महामार्ग रोखण्यात आला.
मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द झाले. ठाकरे सरकारला आलेले हे अपयश लपविण्यासाठी त्यांनी ओबीसीचे आरक्षण घालविले असा घणाघाती आरोप यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने करण्यात आला. चक्का जाम आंदोलनामुळे वाहनांच्या दूतर्फा रांगा लागलेल्या होत्या.