थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Baramati By Election ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.
बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असल्याचे पाहायला मिळत आहे.
Summary
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत