Chhatrapati Sambhajinagar  
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील प्रकार; मतदान करतानाचं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रिकरण

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chhatrapati Sambhajinagar) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं. उद्या सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. काल सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडलं. यासोबतच उद्या 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

यातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा सर्कलमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान एकूणच शांततेत पार पडले. मात्र पेंडापूर येथील मतदान केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

मतदान करताना मोबाईलमध्ये ते चित्रित करण्यात आल्याचे पाहायला मिळत असून संबंधित व्हिडीओ काही वेळातच मोठ्या प्रमाणावर शेअर झाला. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी असताना देखील हे चित्रीकरण करण्यात आल्याने आता चर्चा सुरू झाली आहे.

Summary

  • मतदान करतानाचं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रिकरण

  • छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील प्रकार

  • केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा