थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Budget Session) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला असून या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात काल अंत्यसंस्कार करण्यात आले. यातच आता अजित पवार यांचे अर्थमंत्रीपद कोणाकडे जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
त्यामध्ये हा अर्थसंकल्प कोण मांडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Summary
यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता
अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा
23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात