थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत असून आजपासून सभांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. फडणवीस 12 जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार करणार आहेत.
आजपासून 3 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद असलेल्या जिल्ह्यात सभा घेण्यात येणार असून उद्या 28 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा पार पडणार आहेत. 7 दिवसांत सुमारे 22 सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात
फडणवीस 12 जिल्हा परिषद निवडणुकांचा करणार प्रचार
28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत घेणार सभा