थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 1 वाजता चांदवड येथे जैन समाजाच्या नमोकार तीर्थ मोहोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. चांदवडच्या मालसाने येथे जैन समाजाचा कुंभ भरलेला आहे.
याठिकाणी मोठ्या संख्येने देशभरातून जैन मुनी आलेले असून जवळपास एक लाख 25 हजार स्क्वेअर फुटांचं मंडप टाकण्यात आले आहे. महिनाभर या ठिकाणी जैन समाजाचे विविध कार्यक्रम होणार असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
Summary
नाशिकमधील चांदवडच्या मालसाने येथे जैन समाजाचा कुंभ
जवळपास 1 लाख 25 हजार स्क्वेअर फुटांचं मंडप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमोकार तीर्थ महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार