(Ajit Pawar Death) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
अजित पवारांसह या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता सीआयडी करण्याची शक्यता वर्तवण्यात करण्यात येत आहे. अजित पवार यांच्यासह पाच जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अकस्मात मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठल्या ही उच्च पदस्थ व्यक्ती यांच्या अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडी तपास यंत्रणा करते. त्यामुळे या अपघाताचा तपास सुद्धा गुन्हे अन्वेषण विभागाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.