थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(HSC Exam 2026) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान होणार आहे.
या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा आणि कनिष्ठ विद्यालयातील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांची नोंदणी असून 13387 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी नियोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. यंदा परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त वातावरण आणि सुरळीत परीक्षा पार पाडण्यासाठी बोर्ड प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. पहिला पेपर इंग्रजीचा असणार आहे. बारावी परीक्षा यंदा पहिल्यांदाच सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी केली जाणार आहे. याशिवाय, सर्व केंद्रांवर भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
Summary
आजपासून बारावीची परीक्षा
15 लाख 32 हजार 487 विद्यार्थी परीक्षेला बसणार
कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथके तैनात