महाराष्ट्र

मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस; भाई जगतापांविरोधात थेट राहुल गांधीकडे तक्रार

Published by : Lokshahi News

मुंबईतील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी थेट मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे.त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे.

"माझ्या पक्षाचा अध्यक्षच माझ्याविरोधात कारवाया करत आहे. माझ्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला, पण स्थानिक आमदार असूनही आपल्याला बोलावलं गेलं नाही. मुंबई युवा काँग्रेस निवडणुकीत आपल्या (झिशान सिद्दीकी) उमेदवाराला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही, असं नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाई जगताप यांनी सांगितलं असल्याचा आरोप," झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा