थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Sunetra Pawar ) सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार राज्याच्या 11 व्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या असून राष्ट्रवादी पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार स्वतः सांभाळणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत.
31 जानेवारी रोजी त्यांनी लोकभवन येथे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. तसेच या नंतर त्या मंत्रालयात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार असून सुनेत्रा पवार विधानभवनात देखील जाणार आहेत.
यातच आज सुनेत्रा पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ सुनेत्रा पवार देखील आज दिल्लीला जाणार असून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार
सुनेत्रा पवार आजच दिल्लीला जाण्याची शक्यता
मोदी आणि अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता