BALASAHEB THACKERAY FORT CLEANLINESS AND CONSERVATION CAMPAIGN LAUNCHED BY EKNATH SHINDE 
महाराष्ट्र

Eknath Shinde: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेचा’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते शुभारंभ

Balasaheb Thackeray: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेचा’ शुभारंभ आज उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ हे ब्रीदवाक्य घेऊन या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री महोदयांनी ही मोहीम राबवण्याची संकल्पना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना सचिव श्री. सिद्धेश कदम यांच्याकडे व्यक्त केली होती. तसेच युनेस्कोने दिलेला जागतिक वारसा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी साहेबांनी त्यांच्यावर सोपवली आहे. उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आता अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनासाठी निवडलेल्या महाराष्ट्रातील ११ गड-किल्ल्यांची स्वच्छता, त्यांचे संवर्धन आणि त्यांचा जागतिक दर्जा कायम राखणे. स्थानिक सामाजिक संस्थांना सोबत घेऊन लोकसहभागातून ही मोहीम राबवली जाणार असून, राज्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या प्रसंगी परिवहन मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम ताई गोऱ्हे, शिवसेना सरचिटणीस व माजी खासदार मा. श्री. राहुल शेवाळे जी, शिवसेना सचिव व विधान परिषद सदस्य मा. डॉ. मनीषा कायंदे जी, शिवसेना उपनेते मा. श्री. संजय निरुपम जी, शिवसेना उपनेते मा. श्री. राजू वाघमारे जी आणि शिवसेना उपनेत्या मा. सौ. शीतल म्हात्रे जी यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गड-किल्ले स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

  • ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ या ब्रीदवाक्याखाली मोहीम राबवली जाणार

  • युनेस्कोने निवडलेल्या ११ गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर

  • लोकसहभागातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संकल्प

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा