MIRA BHAYANDAR MAYOR DIMPLE MEHTA ASSUMES CHARGE, ANNOUNCES ZERO TOLERANCE ON ILLEGAL CONSTRUCTIONS 
महाराष्ट्र

Dimple Mehta: महापौर डिंपल मेहता यांनी मीरा-भाईंदर मनपाचा स्वीकारला पदभार, प्रशासनासोबत पदभार स्वीकारल्यानंतर बैठक

Mira Bhayandar Politics: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनासोबत बैठक घेत शहर विकासाचा आराखडा मांडला.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC) च्या नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता यांनी आज विधिवतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनासोबत पहिली बैठक घेत शहराच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आणि कठोर भूमिका मांडली.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा तब्बल ९ दिवसांच्या विलंबानंतर आज सकाळी ९.३० वाजता पार पडत आहे. मात्र हा विलंब प्रशासकीय कारणांपेक्षा ‘लक्की नंबर’साठी असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू आहे.

या सोहळ्यास भाजप आमदार नरेंद्र मेहता उपस्थित राहणार असून, त्यांच्यासाठी ‘सेव्हन इलेव्हन’ (७११) हा आकडा भाग्याचा मानला जातो. त्यांच्या वाहन क्रमांकापासून कंपनीच्या नावापर्यंत ७११चा वापर असताना, आज ११ तारखेचाच मुहूर्त मुद्दाम साधण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. लोकशाहीत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य असावे की अंधश्रद्धेला, असा थेट सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अवैध बांधकामांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण शहरात वाढत चाललेल्या अवैध बांधकामांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत महापौरांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याची घोषणा केली. त्यांनी एमबीएमसी आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले की शहरातील कोणतेही नवे अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे. तसेच जुन्या अवैध बांधकामांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जर कोणत्याही अधिकाऱ्याची संगनमत आढळल्यास त्यांच्यावरही कडक शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

  • डिंपल मेहता यांनी महापौर पदाचा विधिवत स्वीकार

  • पदभारानंतर तात्काळ प्रशासनासोबत बैठक

  • अवैध बांधकामांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ घोषणा

  • ९ दिवसांच्या विलंबावर ‘लकी नंबर’ची चर्चा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा