महाराष्ट्र

Holi Festival Special Train : होळीचा आनंद दुपटीने! मुंबई-सावंतवाडी 186 विशेष ट्रेन गाड्या; कोकणवासीयांसाठी वेळापत्रक खुले

होळी आणि शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणासह देशातील विविध भागांसाठी एकूण 186 विशेष गाड्या धावणार आहेत.

Published by : Riddhi Vanne

होळी आणि शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणासह देशातील विविध भागांसाठी एकूण 186 विशेष गाड्या धावणार आहेत. त्यापैकी 94 गाड्या होळी स्पेशल तर 94 नियमित विशेष गाड्या असतील. या गाड्यांसाठी आरक्षण 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, एआरपीनुसार पुढील तारखांना बुकिंग सुरू होईल. अनारक्षित तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे मिळतील तसेच ‘रेलवन’ अ‍ॅपवरूनही प्रवासी तिकीट काढू शकतात.

प्रमुख विशेष गाड्या

सीएसएमटी – नागपूर – सीएसएमटी दर रविवारी व मंगळवारी धावणार.
सीएसएमटी – सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष सेवा.
सीएसएमटी – गोरखपूर दररोज विशेष गाडी.
एलटीटी – सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष.
एलटीटी – वाराणसी द्वि-साप्ताहिक सेवा.
एलटीटी – समस्तीपूर एसी विशेष गाडी.
एलटीटी – दानापूर दैनिक विशेष सेवा.
पुणे – नागपूर साप्ताहिक विशेष गाड्या.

या सर्व गाड्यांमध्ये एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांची सोय करण्यात आली आहे. काही गाड्यांमध्ये पॅन्ट्री कारचीही सुविधा असेल.

कोकणात शिमगा साजरा करण्यासाठी जाणारे प्रवासी तसेच होळी निमित्त उत्तर भारतात जाणाऱ्यांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या सणासुदीत प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा