थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Saamana Editorial ) आज बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर सिंहगर्जनेची शताब्दी म्हणत सामनाचा अग्रलेख आहे. सामनातून म्हटले आहे की, 'भारतीय घटनेनुसार प्रत्येक भाषिकासाठी स्वतंत्र राज्य निर्माण झाले. भाषिक प्रांतरचना त्यानुसार झाली. मग फक्त मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यासाठी साडेचार वर्षे दिल्लीशी युद्ध का करावे लागले? मुंबईसह महाराष्ट्र आम्ही लढून मिळवला.'
'मराठी माणसाने रक्त सांडले, बलिदाने दिली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र अखंडच राहायला हवा. ‘‘महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही,’’ अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सिंहगर्जनाच होती.'
'बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना होती. ही सिंहगर्जना आजही घुमत आहे. या सिंहगर्जनेमुळेच महाराष्ट्र सुरक्षित आहे. याच सिंहगर्जनेने मुंबईवर मराठी ठसा कायम राहिला. सिंहगर्जनेला शंभर वर्षे झाली तरी ती जमिनीवर, आसमंतात घुमतच आहे.' असे म्हटलं आहे.
Summary
आज बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती
सिंहगर्जनेची शताब्दी म्हणत सामनाचा अग्रलेख
'ही सिंहगर्जना आजही घुमत आहे. या सिंहगर्जनेमुळेच महाराष्ट्र सुरक्षित आहे'