थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde)महापालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.
गेल्या तीन दिवसापासून नवनिर्वाचित नगरसेवक हे या हॉटेलमध्ये थांबून आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज गट स्थापन करण्यासाठी कोकण भवन येथे जाणार आहेत.
आज सकाळी 11वा. वांद्राच्या ताज लँड्स एंड हॉटेलमधून हे सर्व नगरसेवक बस ने निघणार आहेत. सोबत काही महत्त्वाचे नेते उपस्थित असणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
एकनाथ शिंदेंचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार
गट स्थापन करण्यासाठी कोकण भवन इथं जाणार
वांद्रेच्या ताज लँड एन्ड हॉटेलमधून नगरसेवक बसने निघणार