थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( NCP ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या पतीवर हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
असून या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते शरद बुट्टे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद बुट्टे हे कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर आंबेठाण पाईट परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Summary
पुण्यात सुनिता बुट्टेंच्या पतिवर जीवघेणा हल्ला
सुनिता बुट्टे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार
अज्ञात व्यक्तींकडून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हल्ला