Rohit Shetty 
महाराष्ट्र

Rohit Shetty : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार ; पुण्यातून 5 जणांना अटक

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Rohit Shetty) दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी मध्यरात्री रोहित शेट्टीच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातून 5 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

धायरी, वारजे आणि कर्वेनगर परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली असून चारही आरोपी देशातील कुख्यात गँगशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांनी आरोपींना मुंबई पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.

Summary

  • रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबार प्रकरण

  • गोळीबार प्रकरणी पुण्यातून 4 जणांना अटक

  • धायरी, वारजे आणि कर्वेनगर परिसरातून आरोपींना अटक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा