थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ladki Bahin Yojana eKYC) लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई-केवायसी करताना काही जणांकडून पर्याय निवडताना चूका झाल्या होत्या. या ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. ई-केवायसी करताना पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आल्याने अनेक महिलांना लाभापासून वंचित राहावे लागणार होते. अशा महिलांसाठी ही आनंदाची बातमी असून चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांनाच ही संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती मिळत असून येत्या 31 मार्चपर्यंत सुधारणा करण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. 31 मार्चपर्यंतच ही संधी असणार असून त्यानंतर सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी! e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.'
'या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.' असे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.