'बुली बाई' अॅप प्रकरणी पहिला आरोपी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 'बुली बाई' अॅप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिला आणि त्यांचे फोटोही अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही (auction) लावली जात होती.
बुली बाई अॅप प्रकरण समोर आलेलं असतानाच ही कारवाई करण्यात आलीय.सरकारने एका टेलीग्राम चॅनेलवर कारवाई करत ते ब्लॉक केलं आहे. या चॅनेलवरुन हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. याप्रकरणाची दखल घेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतली असून त्यानंतरच हे चॅनेल ब्लॉक करण्याची कारवाई करण्यात आलीय.
टेलिग्राम चॅनलसंदर्भातील तक्रारींवर ट्विट करुन केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालवं अशी मागणी करणाऱ्या ट्विटलाच अश्विनी यांनी रिप्लाय केला असून हे चॅनेल ब्लॉक करण्यात आलं असून सध्या राज्यातील पोलिसांसोबत या प्रकरणासंदर्भातील चर्चा सुरु असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.