Vikas Gogawale 
महाराष्ट्र

Vikas Gogawale : विकास गोगावलेंना पोलिसांसमोर शरण येण्याचे हायकोर्टाकडून आदेश

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत 2 डिसेंबर रोजी मतदान सुरू असताना मतदान केंद्रबाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Vikas Gogawale ) महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत 2 डिसेंबर रोजी मतदान सुरू असताना मतदान केंद्रबाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. 2 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला होता.

या प्रकरणात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल असून त्यात विकास गोगावले यांचाही समावेश आहे. विकास गोगावले तेव्हापासून फरार आहेत. आता विकास गोगावले फरार आहेत. अद्याप त्यांना पकडण्यात आलं नाही. याच पार्श्वभूमीवर आता 'पोलिसांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत शरण या' असे आदेश मुंबई हायकोर्टानं विकास गोगावले यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी राडा झाला होता. त्याप्रकरणी कोर्टानं विकास गोगावलेंना शरण यायचे आदेश दिलेत. यातच 'मंत्री भरत गोगावले मुलाशी संपर्क साधून शरण येण्यास सांगतील'अशी माहिती महाधिवक्ता यांनी हायकोर्टात दिली. विकास गोगावले कोणत्या पोलीस ठाण्यात समर्पण करणार याकडे लक्ष लागले आहे.

Summary

  • महाड पालिका निवडणुकीदरम्यान मारहाण प्रकरण

  • विकास गोगावलेंना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश

  • सकाळी 11 पर्यंत शरण येण्याचे हायकोर्टाकडून आदेश

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा