महाराष्ट्र

Holi Special Train: होळी सणानिमित्त रेल्वेची मोठी घोषणा: 1400 अतिरिक्त गाड्या, क्षेत्रानुसार वेळापत्रक आणि सुविधा

Indian Railways: होळी २०२६ सणासाठी रेल्वेने १४१० अतिरिक्त स्पेशल ट्रेन जाहीर केल्या आहेत. पूर्व, मध्य, उत्तर भागात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन गाड्या चालवल्या जाणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

होळीच्या रंगीत उत्सवासाठी देशभरातून लाखो लोक गावाकडे रेल्वेने परतणार असून, रेल्वे मंत्रालयाने मार्च महिन्यात तब्बल १४१० अतिरिक्त स्पेशल गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये होळीनिमित्त ११४४ गाड्या चालवण्यात आल्या होत्या, पण यंदा प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ही संख्या दीडपट केली आहे.

गरज पडल्यास १५०० गाड्यांपर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचे रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळणे सोपे होईल आणि प्रवास आरामदायी राहील. पूर्व, मध्य आणि उत्तर भागात प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने ईस्ट सेंट्रल रेल्वे सर्वाधिक गाड्या चालवणार आहे. वेस्टर्न रेल्वे २३१, सेंट्रल रेल्वे २०९, साऊथ सेंट्रल रेल्वे १६० आणि उत्तर रेल्वे १०८ स्पेशल गाड्या चालवणार आहेत.

सणासुदीच्या गर्दीमुळे रेल्वेवर ताण येतो, त्यामुळे स्पेशल गाड्या चालवून तिकीट उपलब्धता वाढवली जात आहे. मात्र, आजपासून रेल्वे तिकीटांच्या दरात वाढ लागू झाल्याने सामान्य प्रवाशांच्या खिशाला चिंता आहे. याशिवाय, पुणे-दिल्ली दरम्यान थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे मांडली आहे.

पुणे हे शिक्षण, उद्योग, आयटी आणि संरक्षणाचे केंद्र असल्याने राजधानीशी वेगवान प्रीमियम कनेक्टिव्हिटी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेने सुविधा आणि सुरक्षेवर विशेष भर दिला असून, होळीच्या उत्सवात प्रवास सुखकर होण्याची अपेक्षा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा