थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Wardha) वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कर्मचाऱ्यांकडून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशीही सुरू असून नियमितीकरण, योग्य वेतनश्रेणी व इतर लाभांच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
भरती जाहिरातीत नमूद असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाऐवजी ‘कनिष्ठ’ पद देण्यात आल्याचा तसेच जाहिरातीनुसार वेतनमान न ठरवल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. उपोषणस्थळी खासदार अमर काळे यांनी भेट देत आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शासकीय बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे साांगितले.
Summary
वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण
विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू
खासदार अमर काळेंनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट