थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vilas Bhumre) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक आहे आणि सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. यासोबतच 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करताना आमदार विलास भुमरेंनी EVMजवळ मुलालाही नेलं. मुलाला सोबत घेऊन विलास भुमरेंनी EVMचं बटण दाबल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी मतदान केल्यानंतर स्वत:चं बोट पुढे ठेवले आणि त्यानंतर वडिलांच्या बोटाला शाही लावली जात असल्याचे पाहताच मुलाने ही बोट पुढे केले.
यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने लहान मुलाच्या बोटाला देखील ही शाई लावल्याचे पाहायला मिळत आहे.आमदार विलास भुमरे यांचे चुलत बंधू शिवराज भुमरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Summary
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी EVMजवळ मुलालाही नेलं
छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड मतदान केंद्रवरील प्रकार
मुलालासोबत घेऊन विलास भुमरेंनी EVMचं बटन दाबलं