LPG Price Hike 
महाराष्ट्र

LPG Price Hike : अर्थसंकल्पाआधी सर्वसामान्यांना महागाईचा झटका; आजपासून गॅस सिलिंडर महागला,जाणून घ्या दर

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(LPG Price Hike) आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असणार आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील सामान्य नागरिकांपासून ते उद्योगजगत, शेतकरी आणि गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांच्या अपेक्षा या बजेटशी जोडल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थसंकल्पाआधीच आता सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

आजपासून व्यावसायिक गॅल सिलिंडरच्या किमती वाढल्याची माहिती मिळत आहे. आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅसचा दर आता 1692 रुपये इतका झाला आहे, तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार

  • अर्थसंकल्पाआधी सर्वसामान्यांना महागाईचा झटका

  • आजपासून गॅस सिलिंडर महागला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा