(Jay Pawar) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या विमान अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
यातच आता या घटनेचा तपास करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर काल रोहित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले गेले. रोहित पवार यांच्यानंतर आता जय पवार यांनी देखील सवाल उपस्थित केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जय पवार म्हणाले की, 'विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे.' असे जय पवार यांनी म्हटले आहे.
Summary
रोहित पवारांनंतर जय पवारांकडून संशय व्यक्त
'VSR विमानांवर तात्काळ बंदी घाला'
'विमान देखभालीची निष्पक्ष चौकशी करा'