महाराष्ट्र

Marathi Schools : मराठी शाळांच्या प्रश्नांवर शिक्षण समिती अध्यक्षा यांच्यासोबत संयुक्त बैठक

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या उपस्थितीत सोमवारी मराठी शाळांचे संस्थाचालक व शिक्षक संघटनांची संयुक्त बैठक पार पडली.

Published by : Riddhi Vanne

राजेश गुप्ता

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या उपस्थितीत सोमवारी मराठी शाळांचे संस्थाचालक व शिक्षक संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. शिक्षणतज्ज्ञ डॉ. विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीत महामुंबई शिक्षण संस्था, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ तसेच विविध शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या बैठकीत शिक्षण क्षेत्राशी संबंधित गंभीर व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनांच्या वतीने अध्यक्ष सदानंद रावराणे, उपाध्यक्ष राजेंद्र प्रधान, कार्यवाह डॉ. विनय राऊत, शिक्षक नेते डॉ. विशाल कडणे तसेच फादर स्वामी यांनी नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचे अभिनंदन केले आणि शाळांच्या हितासाठी विधायक संवाद साधला.

सादर केलेल्या निवेदनात शाळांवरील वीज, पाणी व इतर कर निवासी दराने आकारणी करावी, मालमत्ता करातून संपूर्ण सूट द्यावी, आरटीई कायदा २००९ अंतर्गत अनावश्यक मुदतवाढ प्रक्रिया रद्द करावी, तसेच २५ टक्के आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची प्रलंबित रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय बीएमसी इमारतींमध्ये कार्यरत अनुदानित मराठी व प्रादेशिक माध्यमांच्या शाळांवरील वार्षिक १० टक्के भाडेवाढ स्थगित करणे, भाडेतत्त्वावर दिलेल्या वर्गखोल्यांची संख्या कायम ठेवणे, वेतनेतर अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे, तसेच शिक्षक व लिपिकांच्या रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली.

प्राथमिक अनुदानित शाळांसाठी सरल (SARAL) पोर्टलचे लॉगिन उपलब्ध नसल्याने शिक्षक भरती व प्रशासकीय प्रक्रिया रखडल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी सर्व मुद्द्यांची सकारात्मक दखल घेतली असून, पुढील ८ ते १० दिवसांत पुन्हा बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ही बैठक शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी उपयुक्त ठरली असून, महानगरपालिका क्षेत्रातील शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

थोडक्यात

  1. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

  2. बैठक सोमवारी झाली आणि मराठी शाळांचे संस्थाचालक व शिक्षक संघटना सहभागी झाल्या.

  3. बैठकीचे नेतृत्व शिक्षणतज्ज्ञ डॉ. विशाल कडणे डॉ. विशाल कडणे यांनी केले.

  4. या बैठकीत महामुंबई शिक्षण संस्था, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ तसेच विविध शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

  5. उद्देश: शाळा आणि शिक्षक संघटनांमधील समन्वय व शैक्षणिक विकासावर चर्चा करणे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा