थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Indapur) इंदापूर तालुक्यात 21 वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरणी आता भिगवणमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात 21 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
भिगवण परिसरातील आयान शेख आणि हारुन शेख या युवकांनी मुलीचे अपहरण केल्याने भिगवण परिसरातील हिंदू संघटना प्रचंड आक्रमक झाले असून या प्रकरणी आता भिगवन परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे- सोलापूर महामार्ग रोखून धरत जोरदार निदर्शने करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच पुणे- सोलापूर महामार्ग अडवत टायर पेटवण्यात आले आहेत. अपहरण करणाऱ्या नराधमाला अटक करण्याची मागणी आता करण्यात येत असून आज 18 फेब्रुवारी 2026 रोजी भिगवण शहर बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
इंदापूर तालुक्यात 21 वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरण
भिगवनमध्ये हिंदू संघटना आक्रमक
तरुणीच्या अपहरणानंतर हिंदू समाज आक्रमक