थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kirit Somaiya) MIMची मुंब्रातील तरुण नगरसेविका सेहर शेखची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुंब्रा परिसरात एआयएमआयएमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून AIMIM कडून सहर शेख यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
या निकालानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी विजयी सभा घेतली.या सभेमध्ये बोलताना सहर शेखने "मुंब्रा को हरा बना देंगे" असे वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सहर शेखच्या या वक्तव्याच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या तक्रार दाखल केली.
त्यानंतर आज पुन्हा किरीट सोमय्या मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देणार आहेत. सोमय्या पुन्हा सहर शेखविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. सोमय्यांच्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा दावा केला असून आज ते मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देणार आहेत.
Summary
सहर शेखच्या वक्तव्याविरोधात सोमय्या आक्रमक
सोमय्या पुन्हा सहर शेखविरोधात करणार तक्रार
सोमय्यांच्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा दावा