EKYC CORRECTION WINDOW OPEN FOR ELIGIBLE SISTERS, KNOW NEW RULES 
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! फक्त 'या' बहिणींना eKYC करण्याची संधी, जाणून घ्या नवीन नियम

Maharashtra Government: चुकीचे पर्याय दुरुस्त करा, आधार-OTP पूर्ण करा आणि १५०० रुपयांचा मासिक हप्ता व सहा हजार रुपयांची रक्कम सुरक्षित करा. अंतिम मुदत ३१ डिसेंबर.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा eKYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू केली आहे. ही सुविधा फक्त ज्या महिलांनी पूर्वी अर्ज भरलेला असून त्यात चुकीचे पर्याय निवडले किंवा eKYC प्रक्रियेत त्रुटी झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी उपलब्ध आहे, तर नवीन eKYC करणे शक्य राहणार नाही.

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण न झालेल्या eKYC मुळे अशा महिलांना पुढील १५०० रुपयांचा महिन्याचा लाभ मिळणार नाही, अशी तंबी सरकारने दिली आहे. योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (ladakibahin.maharashtra.gov.in) जाऊन लाभार्थी आपल्या आधार लिंक बँक खात्याची माहिती तपासून चुका दुरुस्त करू शकतात.

पोर्टलवर स्पष्ट संदेश आहे की ही संधी केवळ चुकीच्या पर्याय निवडणाऱ्यांसाठी असून, योग्य eKYC न केल्यास अर्ज प्रलंबित राहील आणि रखडलेल्या हप्त्यांची रक्कम जमा होणार नाही. आधार प्रमाणीकरण आणि पती किंवा वडिलांच्या आधार तपशीलांसह OTP प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे, ज्यामुळे पारदर्शकता आणि योग्य लाभार्थींना मदत मिळेल.

राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाचवेळी सहा हजार रुपयांचे एकरकमी वितरण होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये जमा झाला असला तरी पडताळणीनंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचे चार हप्ते नवीन आर्थिक वर्षात एकत्र मिळू शकतात. दरमहा १० तारखेला हप्ता जमा होण्याचे सरकारचे आधीचे आश्वासन eKYC पडताळणीत अडकले असून, तातडीने दुरुस्ती करून अर्ज पूर्ण करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • लाडकी बहीण योजनेत फक्त चुकीचे पर्याय निवडणाऱ्या बहिणींना eKYC दुरुस्तीची संधी.

  • आधार लिंक बँक खात्यासह OTP प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य.

  • योग्य eKYC न केल्यास मासिक १५०० रुपयांचा हप्ता व अर्ज प्रलंबित राहील.

  • डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते एकत्रितपणे नवीन आर्थिक वर्षात जमा होऊ शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा