EKNATH SHINDE ANNOUNCES HIKE TO RS 2100, BIG RELIEF FOR WOMEN IN MAHARASHTRA 
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! १५०० वर पडणार पूर्णविराम? शिंदेंची घोषणा; नवीन आकडाही जाहीर

Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेतील रक्कम वाढणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा तत्कालीन महायुती सरकारला मोठा फायदा झाला होता. आता पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर निवडणूक प्रचारात १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सत्तेत येऊन दीड वर्ष लोटली तरी वाढ झाली नाही. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घोषणा केली आहे.

शिंदे म्हणाले, "लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. या योजनेला कोणीही थांबवू शकत नाही. सत्ता येते-जाते, पण नाव गेले की परत येत नाही, हे बाळासाहेब ठाकरे सांगायचे. पैसा-संपत्तीपेक्षा मी किती माणसांचे प्रेम कमावले हे मला महत्त्वाचे आहे. मी दिलेला शब्द पाळणारा आणि जगणारा आहे. हे महाराष्ट्रातील मनातील सरकार आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लखपती करणार आहोत. आम्ही २१०० रुपये देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण करणार आहोत." याशिवाय शेतकरी कर्जमाफीचा निर्णयही योग्य वेळी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे हे यापूर्वीही एक-दोन वेळा या योजनेच्या वाढीबाबत बोलले होते. आता त्यांच्या या स्पष्ट घोषणेने लवकरच सन्मान निधीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या योजनेच्या विस्ताराने राज्यातील लाखो महिलांना फायदा होईल आणि राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात.

  • महायुती सरकारने २१०० रुपये देण्याचे निवडणूक आश्वासन दिले होते.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्कम वाढवण्याची स्पष्ट घोषणा केली.

  • योजनेचा विस्तार झाल्यास लाखो महिलांना थेट आर्थिक लाभ मिळणार.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा