महाराष्ट्र

कोरोनाचे सावट : विधिमंडळ अधिवेशन चालणार 10 दिवस, 8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन 1 मार्चपासून सुरू होणार असून ते 10 दिवस चालणार आहे. तर, 8 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

कामकाज सल्लागार समितीची 18 फेब्रुवारी रोजी बैठक झाली होती. त्यात 8 मार्चपर्यंतच्या पहिल्या आठवड्याचे कामकाज निश्चित करण्यात आले होते. तथापि, वेगाने होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आज (25 फेब्रुवारी) कामकाज सल्लागार समितीची आढावा बैठक झाली. त्यात 10 दिवसांचे कामकाज निश्चित करण्यात आले, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी दिली.

मात्र, अधिवेशनाचा कालावधी सहा आठवड्यांचा करण्याचा आग्रह विरोधकांचा होता. पण 10 दिवसच अधिवेशन चालणार असल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. कोरोनाच्या नावाखाली सरकार पळ काढत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा