महाराष्ट्र

Sanjay Raut : ‘गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला’; राऊतांचा शिंदेंवर घणाघात

परभणी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल यांनी 39 मते मिळवत महापौरपद पटकावले.

Published by : Varsha Bhasmare

परभणी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल यांनी 39 मते मिळवत महापौरपद पटकावले. भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांनाही 39 मते मिळाली होती. मात्र प्रक्रियेनंतर सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड निश्चित झाली. काँग्रेसचे गणेश देशमुख यांची उपमहापौरपदी निवड झाली. या निवडीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीत ठाकरे गटाचा “खरा चेहरा” समोर आल्याची टीका केली. मुस्लिम महापौर झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शिंदेंच्या या वक्तव्याला ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंवर टीकास्त्र सोडले. “त्या एकनाथ शिंदेंना सांगा जरा अभ्यास करा. परभणीत भाजपचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत, हे त्यांना माहीत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “या देशात आणि महाराष्ट्रात मराठी भाषिक मुस्लिम आहेत. ते घुसखोर नाहीत. आमचे तालुकाप्रमुख, पदाधिकारी वर्षानुवर्षे काम करत आहेत. मुसलमान म्हणून त्यांना दूर ठेवणार का?” असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला. “तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला,” असा घणाघात करत राऊतांनी शिवसैनिकांच्या निष्ठेचा मुद्दा पुढे केला. परभणीचे नवे महापौर सय्यद इक्बाल हे पक्षाचे जुने कार्यकर्ते असून त्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी राऊतांनी देशातील सर्वोच्च पदांवर मुस्लिम व्यक्तींनी काम केले असल्याचे उदाहरण देत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचाही उल्लेख केला. “भाजपनेही विविध ठिकाणी मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. मग मुस्लिम महापौर झाल्यावर आक्षेप का?” असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, परभणीतील या निकालामुळे स्थानिक राजकारणासोबतच राज्याच्या पातळीवरही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पुढील काही दिवसांत या मुद्द्यावरून आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा