थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result ) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल येणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. तर शनिवारी 23 ठिकाणी उर्वरित मतदान पार पडले.
मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल.
टप्प्याटप्प्याने प्रत्येक प्रभागाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.