MEHKAR POLICE RAID SEIZES OPULENT OPIUM PLANTATION WORTH 1.32 CRORE, TWO FARMERS ARRESTED 
महाराष्ट्र

Mehkar Police Action: मेहकर तालुक्यात सव्वा कोटींची अफू जप्त; पांग्री काटे शिवारात पोलिसांची मोठी कारवाई,​ दोन शेतकऱ्यांना अटक

​NDPS Seizure: मेहकर तालुक्यात पोलिसांनी दोन शेतकऱ्यांकडून १ कोटी ३२ लाख रुपये किंमतीचा अफूचा साठा जप्त केला, NDPS कायद्यान्वये दोघांनाही अटक करण्यात आली.

Published by : Dhanshree Shintre

संदिप शुक्ला | लोकशाही मराठी न्यूज

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पांग्री काटे शिवारात अवैध अफूच्या शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन वेगवेगळ्या शेतात करण्यात आलेल्या या लागवडीवर पोलिसांनी धाड टाकून तब्बल १ कोटी ३२ लाख रुपयांची अफूची झाडे, बोंडे आणि फुले जप्त केली आहेत. याप्रकरणी दोन शेतकऱ्यांना एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पांग्री काटे शिवारातील गट क्रमांक १४८ आणि १२८ मध्ये अफूची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकला. यावेळी शेतात कपाशी किंवा इतर पिकांच्या आडोशाला अफूची लागवड केल्याचे निष्पन्न झाले.

​सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त

​पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर अफूचा साठा जप्त करण्यात आला आहे. भागवत सदाशीव काटे यांच्या शेतातून १०७ किलो ६६० ग्रॅम वजनाची अफूची झाडे, बोंडे आणि पाने जप्त करण्यात आली. विशाल रमेश काटे यांच्या शेतातून ५७ किलो ३२० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे १ कोटी ३२ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

​एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

​ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

​परिसरात खळबळ

​मेहकर सारख्या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अफूची शेती उघडकीस आल्याने कृषी व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यंत पोहोचलेले आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा