थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Baramati ) अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणाच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये तासाभरापासून ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत आता अजित पवार यांची बहिण विजया पाटील या देखील सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. विजया पाटील यांनी या बैठकीला हजेरी लावल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.